जुव्याचा दुर्ग (किल्ला) उर्फ सेंट इस्टेवांम.
"फिरंग्याचे दैव समुद्रांनी रक्षिले."
मराठे पोर्तुगीज लढाईच्या इतिहासातील एक सुवर्ण पान या दुर्गामुळे लिहल गेलं.
1689 साली पोर्तुगीजांनी टेहाळणीसाठी मराठे व पोर्तुगीज यांच्या सीमेवर तिसवाडी तालुक्यातील डिचोली व फोंडा या तालुक्याच्या सीमाभागात असलेल्या मांडवी नदीच्या बेटावर एका टेकडीवर किल्ला बांधला.
या जुवे बेटावरील किल्ल्याला कॅथलिक संताच्या नावावरून सेंट इस्तेव्हांव अस नाव पोर्तुगीजांनी दिले. या किल्ल्याच्या चारही बाजूला नैसर्गिक दलदल आहे.
अवघड वाट,मदतीला असणारा समुद्र (आणि पोर्तुगीज स्वतःला सात समुद्राचे स्वामी म्हणून घेत होते, त्यामुळे) पोर्तुगीजांनी जुना गोव्यात त्यांची राजधानी स्थापन केली. राजधानीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला पोर्तुगीजांकडे असने अत्यंत महत्वाचं होत, हे जसे पोर्तुगीजांना माहीत होतं... तसच छत्रपती संभाजी महाराजांनाही माहीत होतं, जर फोंडा जिंकल्यानंतर पुढे जुन्या गोव्यात सत्ता स्थापन करायची असेल तर हा किल्ला ताब्यात घेणं फार गरजेच होत, आणि त्यासाठी 24 एप्रिल 1683 रोजी छत्रपतींनी एक गुप्त मोहीम हातात घेतली, रात्री 8 च्या सुमारास महाराजांच सैन्य कालवा (नैसर्गिक दलदल) पार करून जुवे गावात शिरलं. महाराजांनी ही मोहीम अत्यंत गुप्त ठेवली होती, कोणालाही या मोहिमेचा कानोकान खबर नव्हती. (खरंतर अश्या जोखमीच्या मोहिमेसाठी गुप्तहेर खात फार उपयोगी ठरत हे इतिहास सांगतो, त्याशिवाय अश्या लढाया यशस्वी होत नसतात. मात्र या ठिकाणी गुप्तहेर कोण होत हे इतिहासालाच माहीत..) रात्रीच्या अंधारात गनिमी काव्याच्या आधारे मराठ्यांनी त्या छोट्याश्या जुवे किल्यावर हल्ला केला, ( किल्ला फार छोटा होता, आपल्या जाधवगड एवढा)
रात्री हल्ला करून गड ताब्यात घेणं मराठ्यांना नवीन नव्हतं, पन्हाळा, सिंहगड सारखी कैक उदाहरण डोळ्यासमोर होती. त्यातही हा छोटा किल्ला आणि समोर पोर्तुगीज सैन्य. अचानक झालेल्या हल्ल्याला पोर्तुगीज तोंड देऊ शकले नाही आणि त्यांनी हार मानली. गड मराठ्यांच्या ताब्यात आला, जुव्यावर भगवा फडकला.
सपाटून मार खाल्लेले पोर्तुगीज पळून जाऊन धावजी नावाच्या जुन्या गोव्यातील गावात गेलं आणि त्यांनी पोर्तुगीजांना माहिती दिली की संभाजीने जुवे बेट आणि किल्ला घेतला. ज्या किल्ल्याच्या आधारावर पोर्तुगीज गोव्यातील राजधानी ठरवत होते, तो किल्ला मराठ्यांनी असा रात्रीत जिंकून घेतल्याने पोर्तुगीजांची दातखिळी बसली. ज्याचा विचार त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असताना केला नव्हता, ती गोष्ट त्यांच्या मुलाने सहजशक्य केली होती. पोर्तुगीजांनी मनोमन देवाचे आभार मानले असतील, नशीब त्यावेळी शिवाजीने याचा विचार केला नाही...
(थोरल्या महाराजांची गोवा स्वारी यावर सविस्तर लेख नंतर लिहणार आहे)
पोर्तुगीज विरजई आणि पाद्री लोकांची तर बोबडी वळली... (हेच ते पाद्री लोक जे हिंदूंवर अत्याचार करीत होते, लोकांचे कान कापुन टाकत, आणि स्त्रियांना बाटवत होते. आता संभाजी आपले काय हाल करणार याची त्यांना जाणीव झाली होती.) या लढाईच्या अवघ्या 15 दिवसापूर्वी दुर्भाटच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव झाला होता. आणि आता हे दुसरं संकट...
रात्री जुन्या गोव्यात पोर्तुगीजांना छत्रपती संभाजी महाराजांनी जुवे बेट घेतल्याची बातमी मिळाली आणि त्यांचा ठाम समज झाला की उद्या संभाजी जुन्या गोव्यात येणार आणि आपली सत्ता संपावणार. चर्च मधील मोठमोठ्या घंटा येणाऱ्या प्रलयाची जाणीव देत जोरजोरात वाजत होत्या, तसा आदेशच दिला असेल.. रात्रभर कोणालाही झोप नव्हती... लागणारही नव्हती.
संभाजी उद्या आपल्यावर चालून येईल त्या ऐवजी आपणच त्यावर चालून जाऊ अस विजरई कोंद-दि-आल्व्हर ने ठरवलं. आणि तो रात्रीच सैन्य घेऊन जुवे बेटाकडे निघाला. मात्र तो धावजीत थांबला. धावजी हा 2 बुरुज असलेला छोटासा किल्ला होता, या किल्ल्यावर स्वतः विजरई कोंद-दि-आल्व्हर रात्रभर पहारा देत राहिला.
इकडे किल्ला जिंकला त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 एप्रिल ला स्वतः संभाजी महाराज किल्ला बघायला जुवे बेटावर आले. स्वतः शिवरायांचा पुत्र संभाजी महाराज जुव्याचा आले आहेत हे बघून तिथल्या पंचक्रोशीतील जनता महाराजांच्या दर्शनाला जमली.
सकाळी 10 च्या सुमारास विरजई धावजी उतरून जुवे गावात शिरला... पोर्तुगीज सैन्य बघून सुरवातीला मराठे मागे फिरले.. मराठ्यांना मागे फिरताना बघून विरजई आणि त्याच्या सैन्याला जोश आला.. पण आपण स्वतःहून मृत्यच्या दारात चाललो आहोत याचा त्यांना अंदाजही नव्हता. मराठ्यांचा गनिमी कावा या भूतलावर कोणालाही कळला नव्हता- तोरणा जिंकून स्वराज्याच बांधलेलं तोरण असो- आग्र्यातून यशस्वीपणे निसटलेले महाराज असो- पन्हाळाचा वेढा फोडून गेलेले महाराज असो- की सुरतेची लूट असो- अशी असंख्य प्रकरणे होती जिथला गनिमी कावा शत्रूला आजही कळला नव्हता- मरेपर्यंत कळणार नव्हता.
तर मराठयांना पळताना पाहून त्यांच्या मागे लागलेले सैन्य आता किल्याच्या जवळ आलं होतं, आणि अचानक पळणारे मराठे मागे फिरले आणि त्यांनी पोर्तुगीजांवर हल्ला चढवला, अचानक झालेला हा बदल पाहून विरजई पुरता गोंधळून पडला, आणि त्यातच स्वतः संभाजी महाराज त्यांचं घोडदळ घेऊन युद्धात सहभागी झाले. आता मात्र संभाजी महाराज बेभान होऊन लढत होते... त्यांचं ते रूप बघून विरुजई कडे पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. विरजई आल्या मार्गे पळाला... पण भरतीमुळे वाढलेलं पाणी आणि परतीचे तुटलेले दोर यामुळे काय करावं हे त्याला कळेना- त्याने पाळणाऱ्या सैन्याला थांबवायचा प्रयत्न केला, मात्र त्या रुद्रावतारासमोर सगळेच हतबल झाले होते, छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांची कत्तल करतच होते, विरजई ला काय करावं कळत नव्हतं...आणि शेवटी तो दलदलीतून पलीकडे धावजीकडे पळत सुटला- त्याबरोबर असलेल्या सैन्याला मारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या मागे मागे होते- विरजई खाडी जवळ पोचला हे बघून महाराजांनी घोडा सरळ खाडीच्या दिशेने घातला, खाडीला पाणी जास्त होतं..आणि अचानक महाराजांचा घोडा उलटला...... महाराज पाण्यात पडले आणि मागून येणाऱ्या चिटणीस खंडो बल्लाळ याने पाण्यात उडी मारून संभाजी महाराजांना पाण्यातून बाहेर काढले... हे तेच खंडो बल्लाळ ज्यांच्या वडिलांना महाराजांनी गैरसमजुतीतुन हत्तीच्या पायी देऊन मारले होते. पुढे चूक लक्षात आल्यावर महाराजांनी त्यांची समाधी बांधली आणि खंडो बल्लाळ याना सेवेत रुजू केले.
विजरई परत एकदा आपला जीव वाचवून जुन्या गोव्यात पळाला. आता तर जुन्या गोव्यातील चर्च आणि कॅथलिक मठांमध्ये हाहाकार उडाला होता. पोर्तुगीजांची फजिती आणि संभाजी महाराजांचा पराक्रम जुवे पंचक्रोशीतील जनता आपल्या डोळ्यांनी त्या दिवशी पाहत होती.
त्या दिवशी मराठा सैनिकांनी जुवे गावातील पोर्तुगीजांचे चर्च आणि मठाची लूट करून त्याची मोडतोड करून टाकली आणि दुसऱ्या दिवशी जुवे गाव सोडून संभाजी महाराज परत फोंड्यास आले.
त्यामुळे खरेच ते दिवशी फिरंग्याचे दैव समुद्रांनी रक्षिले.
लेख आवडला असल्यास अथवा काही प्रश्न असल्यास जरूर कमेंट करा.
फोटो साभार - सुप्रभा बहिरम.
संदर्भ- मराठे पोर्तुगीज संबंध.
श्री सचिन मडगे यांचे लेख.

धन्यवाद.
फोटो साभार - सुप्रभा बहिरम.
संदर्भ- मराठे पोर्तुगीज संबंध.
श्री सचिन मडगे यांचे लेख.
खूप छान.....
ReplyDeleteगिव्यात किती किल्ले आहेत?
सगळे पाहायला किती दिवस लागतील ?
तू सगळे मला दाखवणार का?
मी पाहून आता जवळ पास 20वर्ष झाली आहेत, कधी दकवणार ?
मिलिंद क्षीरसागर