पांडवांची गादी... न उलगडलेलं कोडं.
मध्यंतरी रायगडच्या फेऱ्या वाढल्या होत्या, रायगडावर एक दोन नव्हे 4 हक्काची घर झाली आहेत, सखू मावशी, गोरे काका, गणेश ही मंडळी त्यापैकीच. जेव्हापासून रायगडला येणं होत होत , तेव्हापासून ऐकत होतो की रायगडच्या मागील बाजूस म्हणजे मानगडच्या जंगलात आहे पांडवांची गादी.
रायगड आणि परिसर हा तसा प्राचीन...
पण त्याचा संबंध थेट महाभारतात/ रामायणात जातो हे माहीत नव्हतं.
कुठे तरी वाचलं होतं की ह्या भागात कुठेतरी प्रभू श्रीराम आणि पांडवांचा स्वतंत्र मुक्काम पडला होता. पण ह्याचा पुरावा मिळत नव्हता.
2-3 वर्ष मी आणि माझे सहकारी 'अमोल तावरे' आम्ही ह्याचा पाठपुरावा करत होतो. रायगड आणि आसपासच्या भागात जाता येता चौकशी करत होतो, अचानक एके दिवशी आम्ही रायगडवरून मानगड- पाचाड मार्गे परत येताना एक बातमी लागली की मानगडच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाडीमध्ये बाळकृष्ण गव्हाणे (बुवा) नावाची एक व्यक्ती आहे, ज्याने ते पांडवांची गाडी किंवा "सिंहासन" बघितलं आहे... ही व्यक्ती देवीची पुजारी आहे आणि त्याला देवींनी साक्षात्कार दिला आणि वर दाट जंगलात असलेल्या हा जागेबद्दल दृष्टांत दिला....
झालं त्या माणसाचा शोध घेतला आणि आमची स्वारी निघाली या ऐतिहासिक गोष्टीकडे.
धनगरवाडी गावातून 3-4 तास चालल्या नंतर(जंगलातुन- कोणत्याही प्रकारची वाट नाही.. ) शेवटी आम्ही एका जागी आलो, संपूर्ण डोंगरावर चढ होता ( तो असतोच) पण इथे मात्र जवळपास 6-7 गुंठे एवढी सपाट जागा होती. मोठमोठे तळखडे होते सोबतच इतर अशा गोष्टी होत्या ज्या सिद्ध करत होत्या की इथे अगोदर कोणीतरी राहत असावं.
बर ही जागा प्राचीन नसून शिवकालीन असावी किंवा फारफार तर त्या आधी 100 वर्षांपूर्वीची असावी असा विचार मनात आला, कारण इतिहास हा विषय भावनिक नसून वास्तववादी आहे हे आम्हाला माहीत होतं. पण या ठिकाणी असलेले तळखडे आणि ती जागा तसं दर्शवित नव्हती, आजवर वेगवेगळे किमान 200 किल्ले बघितले होते आणि त्यामुळे हे तळखडे शिवकालीन नाहीत असं पक्क झालं.
जो माणूस आम्हाला इथे घेऊन आला त्याला ह्या ठिकाणी काळघाई देवीचा (मोरेंची कुलदैवत) साक्षात्कार झाला होता,
आणि म्हणून फक्त हीच व्यक्ती आजवर इथवर येऊ शकली होती. अन्य कोणी इथे पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी त्याला वाट सापडत नसे. (ही माहिती आम्हाला परत खाली आल्यावर गावातल्या लोकांनी दिली. आणि तो आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता)
याच ठिकाणी त्यांना सितामातेची जोडवी, गळ्यातील काही ऐवज, आणि बांगड्या(धातूच्या) सापडल्या. सोबतच यादव कालीन काही होन आणि सोन्याच्या मोहरा देखील सापडले. ( यातील काही गोष्टी आम्ही स्वतः बघितल्या आहेत, फोटो काढू न दिल्याने फोटो काढले नाहीत, नंतर कोणीतरी पुरातत्व विभागातून आलो आहे, अस सांगून यातील काही होण आणि बाकी वस्तू गायब केल्या; जी दुर्दैवी गोष्ट आहे.
ह्याच ठिकाणी【 पूर्वी आपण बघत असाल तर आठवेल की "सिंहासन बत्तीशी" कार्यक्रम लागत होता...】 त्यासारखं एक दगड आहे...ज्यात 32 दिवे लावायला जागा आहे.
हा दगड आतून पूर्ण पोकळ आहे.. आणि त्याला आत जायला एक दरवाज्यासारखी जागा आहे ... पण ती बंद आहे.
संपूर्ण डोंगरावर उतार आहे पण फक्त हीच जागा सपाट आहे. ह्या ठिकाणी 12 महिने राणफळे, आणि जंगली फळे असतात जेणेकरून खाण्याची चिंता राहत नाही... जवळच एक छोटं तळ आहे, ज्यात जिवंत झरे असलेली विहीर आहे.
फक्त इथून फळे बाहेर नेऊ नये असं ते म्हणाले. आम्ही मनसोक्त 2 फणस खाल्ले..
जागेची पाहणी केली... काही फोटो काढले आणि मागच्या प्रवासाला निघालो.
(टीप- सदर माहिती ही बुवा (ज्यांनी ही जागा शोधली ते आणि स्थानिक लोकांनी दिली आहे, या बद्दल आम्ही सत्यता तपासण्यासाठी प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.) वर्ष - जून 2015

(याच ठिकाणी मोरेंनी देवीला कौल लावला होता,जेव्हा महाराजांनी रायरी म्हणजे रायगडचा डोंगर ताब्यात घेतला होता.

Mast
ReplyDelete