रायगडावरील साठा.
अन्नधान्य, शस्त्रसाठा आणि खजिना.
रायगड
ही स्वराज्याची राजधानी. अर्थातच गडावर राबता जास्त असणार, राबता जास्त
म्हणजे अन्नधान्यही जास्तच लागणार. शत्रुने गडाला वेढा दिल्यास गड अभेद्य
आहेच.. मात्र केवळ अन्नधान्य नाही म्हणुन गड सोडावा लागु नये म्हणुन गडावर
भरपुर धान्य होतं.
यासाठी गडाप्रमाणेच गडाखालीही
धान्याची कोठारे होती, रायगड जवळच्या "वाडी" या गावातुन रायगडावर
जाण्यासाठी जुनी वाट होती, जी पुढे खुबलढा बुरजाच्या आसपास मिळत होती. या
मार्गाने आल्यावर जिथे रायगडचा चढ लागतो तिथे पुर्वी छत्रपतींची बाग होती.
(की बाग होता?) याच ठिकाणी गडास पुरवल्या जाणार्या धान्याची कोठारे होती.
सन 1883 मधे या कोठारांची जोती अस्तित्वात होती हे आवळसकरांच्या 'रायगडची
जीवनकथा' या पुस्तकातून कळते.
पुढे याच मार्गाने वर
आल्यावर महादेवाचा माळ किंवा सध्या मदारी मेहतर या काल्पनिक नावाने ओळखल्या
जाणाऱ्या जागेपासुन पुढे डोंगराला उजवीकडे ठेऊन कडेकडेच्या वाटेने चालत
गेल्यावर पुढे खोदीव खांब सोडुन खोदलेले टाके/लेणी/ खोली आहे त्याला अंधारी
म्हणतात. त्या ठिकाणीही पुर्वी भाताची (तांदुळाची) साठवणुक केली जात होती
हे शिवपुर्वकाळीन व पेशवे दफ्तरात रायगडच्या उल्लेखावरून स्पष्ट होते.
या
अन्नधान्याची साठवणुक गडावरही करणे भाग होतं. त्यासाठी गडावर धान्य
कोठारेही उभारली होती. ही धान्य कोठारे गडावर आहेत, ती आपण बघितली असणार
(राणी महाला समोरची तीन कोठारे)- मात्र आपण बघितली ती खरंच धान्य कोठारे
होती का? हा प्रश्न नक्की पडेल जेव्हा तुम्हाला रायगडावर असलेल्या धान्याचा
साठा केवढा होता हे समजेल.
रायगडवरच्या धान्य
साठ्याचे बरेच उल्लेख मिळतात. त्यात प्रामुख्याने आपण शिवकाळीन 16 वे शतक व
छ. शाहु काळातले 17 वे शतक (पेशवेकाळीन) याचे उल्लेख आणि साठे पाहु.
रायगडवर
छ. शिवाजी महाराजां नंतर स्वराज्याचे वारस शिवपुत्र छ. संभाजी महाराज
गादीवर आले. ऑगस्ट महिन्यात छ. संभाजी महाराजांनी गडावरील कारकुनास सांगुन
गडावरील संपत्तीच्या याद्या काढण्यास सांगितले, महाराजांनी स्वत: याची
तपासनी केली. त्यावेळी गडावर काय काय होते याची थोडक्यात यादी.
यात फक्त अन्नसाठा आहे.
प्रमाण- वीस मण (40 किलो.) = एक खंडी.
या वेळी गडावर मसाल्याचे आणि सुगंधी पदार्थ मोठ्या प्रमाणात होते,
भात - सतरा हजार (17,000) खंडी.
तेल- सत्तर हजार (70,000) खंडी.
सैवंध- दोनशे सत्तर (270) खंडी.
जिरे- दोनशे (200) खंडी.
गोपीचंद - दोनशे (200) खंडी
गंधक - दोनशे (200 ) खंडी.
या शिवाय गडावर अन्य धान्य, डाळी, तंबाखु, साखर, या वस्तु फारच मोठ्या प्रमाणावर होत्या.
गडावर असलेले धातु (खजिना) :-
सोने- नऊ (9) खंडी.
होन -पाच लाख (5,00,000)
तांबे - तीन खंडी (03)
शिसे -चारशे पन्नास खंडी (450)
लोखंड - वीस खंडी (20)
जस्त आणि शिसे यांची मिश्र धातु - चारशे खंडी (400)
चांदी - साडेपाच खंडी. (5.50)
माणकें - दोनशे तोळे. (200)
मोत्ये - एक हजार तोळे. (1000)
हिरे -पाचशे तोळे. (500)
ब्राॅझ - दोनशे बहात्तर खंडी. (272)
नऊ कोटी रूपयांची सोन्याची नानी.
(9,00,00000) रूपयांची नानी.
एकावन्न (51,000) हजार तोळे सोने.
याशिवाय अधिकार्यां जवळ तीन लक्ष होन खरेदीसाठी दिले होते.
रायगड
म्हणजे राजधानी. साहजिकच सुरक्षा अधिक, पहारेकरीही अधिक. त्यांना लागणारी
हत्यारेही अधिक असणार.. पण ती किती? हजार दोन हजार... नाही. बघा किती आणि
काय काय होत गडावर...
रायगडवरील शस्त्रसाठा :-
डर्कस - चाळीस हजार. (40,000)
तलवारी -तीस हजार. (30,000)
भालें - चाळीस हजार (40,000)
लाॅग डर्कस - साठ हजार (60,000)
दुधारी तलवारी - पन्नास हजार. (50,000)
ढाली - साठ हजार. (60,000)
धनुष्यें - चाळीस हजार (40,000)
बाण - अठरा लाख (18,00,000)
हा शस्त्रसाठा स्वराज्यात अन्य ठिकाणी लागेल तिकडेही दिला जात असावा.
शिवकाळात कोथळीगड हा किल्ला मराठ्यांचा शस्त्रभंडार गृह होते.
याशिवाय
छ. शाहु महाराजांच्या समयी (पेशवेकाळात) बरीच वस्तु संपत्ती रायगडावर
होती, ती शिव-शंभुकाळीन असणार. छ.शाहुंच्या समयी (पेशवेकाळात) सिंहासनाच्या
दोन्ही बाजुस भाताची साठवणुक केली जात. याशिवाय गडावर बर्याच वस्तु अनेक
ठिकाणी ठेवल्या जात होत्या..
त्यात लोखंडी सामान :-
गाव्या,
जंत्रपट्या, अंकुश, कडीकोयंडे, पावडी, घण, ऐरणी, थाप्या, नांगरी, फाळ,
त्रिशुळ, कुर्हाडी, तासण्या, भातेनळ्या , गुण्या, चंद्रज्योतींचे घर,
कटार, दाभण, अडकिता, खिळे, कढई, चुना उकरायचे पाते, वाकस, सांडस, तवे,
काहील, विळे, खलबत्ता, वजनें, सुतक्या, करवत, कुलपें, जंजिर्या, बेड्या,
कुदळे, कोयते, मेढी, कात्र्या, सुर्या, निशाणें, तोफांचे गोळे, चिलखताचे
तुकडे आणि अन्य बरंच काही..
जस्त आणि पंचरशी धातुंच्या पदार्थांची यादी:-
ताम्हनें,
घागरी, वाट्या, भगुणीं, तांब्ये, नगार्याचे पुड, पराती, सतेलें, बुधल्या,
मुदाळें, दौती, तपेली, गुंड, गुंडग्या, चरव्या, ताटें.
पितळी वस्तु:-
कर्णे, समया, बुधल्या, परात, वाट्या, चाळाची घुंघरे, दिवट्या, महादेवाची पिंडी, एक तांस, धुपाटणे, गुडगुडीचे परडे,
{या सार्या वस्तु राजघराण्याच्या असाव्यात} याशिवाय अनेक लाकडी पेट्या, अधोल्या, फरें, कांटे-तराजू होते.
विशेष
टिप:- एवढा प्रचंड साठा गडावर होता तर तो कुठे होता? गडावरील सध्या दाखवली
जाणारी धान्य आणि अन्य कोठारे यासाठी पुरेशी आहेत का? तर नाही. 1) राणीवसा
(राणीमहाल) म्हणुन दाखवली जाणारी इमारत हे राणीमहाल नसुन कोठारे असु
शकतात, आणि राण्यांसाठी स्वतंत्र निवासस्थान असु शकते.
2) राणी महालाच्या 7 पैकी काही भाग राण्यांसाठी असतील आणि बाकीचे कोठारा साठी.
3) तुम्ही तुमचा विचार मांडा.. अभिप्राय द्या.
It looks like u are improving with each update.... Good to see the progress. Milind Kshirasagar
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteडर्कस म्हणजे काय??
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteअप्रतिम माहिती
ReplyDelete