रायगड आणि मंदिरे.
रायगड म्हणजेच
स्वराज्याची राजधानी.. राजधानीवर साक्षात महाराजांचे निवासस्थान असताना राजधानीवर एकच
मंदिर असुन कसे चालेल? सध्या ज्ञात असलेल्या मंदिरांपैकी फक्त तीनच मंदिरे
आपल्याला दिसतात.. मात्र प्रत्यक्षात गडावर किती मंदिरे होती ... कोणाची
मंदिरे होती. ती कुठे होती याचा हा मागोवा...
शिर्काई
(शब्दतोड केल्यास लगेच लक्षात येईल की शिरक्यांची देवी/आई.) आजही देवीला
आई म्हणतात. महाराजांच स्वराज्य हे मावळातल्या सवंगड्यांना घेऊन निर्माण
झालं. यांच कुळदैवत होत शिर्काई देवी. (या शिर्काई देवीची मुळ मुर्ती
(रायगडच्याही अगोदरची) आजही मुळशीतल्या "शिरकवली" या गावात आहे.) या
मावळ्यांसाठी आणि गडदैवता म्हणुण शिर्काई देवीचे मंदिरे रायगडावर बांधण्यात
आले. मात्र आत्ता आपल्याला जे मंदीर दिसते ते मुळ मंदिर नाही, हे मंदिर
नंतर शिवसमाधी बांधताना बांधण्यात आले आहे. या मंदिराचा मुळ चौथारा हा
होळीचा माळ ते गंगासागर या दरम्यान असलेला जो चौथारा आहे तोच हा मुळ
मंदिराचा भाग. सिद्दीने किंवा मुघलांनी हे मुळ मंदिर उध्वस्त केल्याने
मुर्ती उघड्यावर पडली होती, वीज पडुन ती थोडी भंगलीही होती, नंतर समाधी
बांधताना या मुर्तीसाठी एक छानस मंदिर बांधुन ही मुर्ती त्यात स्थापन केली.
व्याडेश्वर [सध्याचे प्रचलित नाव जगदिश्वर]
शिवसमाधीच्या समोर असलेले हे शिवमंदिर सध्या जगदिश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.
शिवसमाधीच्या समोर असलेले हे शिवमंदिर सध्या जगदिश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.
महाराज
नित्यपुजेसाठी याच मंदिरात येत.
याच मंदिरात महाराज आणि कवी कलश यांची भेट झाली होती. या मंदिरातील शिवलिंग हे पुर्वी
मंदिराच्या बाहेर पडले होते आणि नंतर ते कोणीतरी मंदिरात आणुन ठेवले असे
दांडेकरांच्या एका पुस्तकात ते म्हणतात.
मंदिरा बाहेरचा नंदी अप्रतिम आणि
गोंडस आहे. असा नंदी मी आजवर पाहिला नाही. या नंदिकडे बघुन वाटते कि
मंदिरातील शिवलिंगही मोठच असाव.
होळीच्या माळावरून पुढे वाघ दरवाज्याकडे जाताना कुशावर्त तलाव
लागतो.. त्याच्या समोरच एक शिवमंदिर आहे. यालाच कुशावर्त महादेव म्हणतात.
याच्या स्थापत्येवरून वाटते की हे शिवमंदिर शिवकाळानंतरचे असावे. किंवा याच
मंदिराच्या बाजुला कवी कलशाचा वाडा होता, तो शाक्त पंथाचा होता, त्यासाठी
खास हे मंदिर नंतर बांधले असावे असे वाटते.
या
मंदिरातील शाळुंख आणि नंदी मंदिरासमोर पडले होते, या मंदिराचा कळसही पडला
होता.. पुढे ती शाळुंख मंदिरात ठेवली आणि प्राणप्रतिष्ठा केली.
महालक्ष्मीचे
स्थान
होळीच्या माळावरून पुढे व्याडेश्वराकडे जाताना राजमार्गाच्या
डाव्या हाताला दगडांनी रचलेले एक छोटेसे चौरसासारखा चौथारा होता, तेच हे
महालक्ष्मीचे स्थान होते. यातील मुर्ती आता पुरातत्व खात्याच्या ऑफीस मधे
असावी.
रायगडच्या पूर्वेला असलेल्या भवानी कड्यावरून खाली उतरल्यास एक घळ लागते.
इथवर जाण्याची वाट थोडी अवघड आहे. या घळीतच भवानी माता तांदळा रूपात होती
असे म्हणतात. आजही या घळीत दगडांनाच शेंदुर लाऊन त्याची पुजा केली जाते. याच
ठिकाणी बहुतेक महाराज एकाग्रतेसाठी येत असावेत. ही जागा आजही अगदी शांत
आहे. (जर या ठिकाणी मुर्ती असती तर ती कुठे गेली? पुरातत्व विभागाच्या
कार्यालयात असलेल्या अनेक मुर्तीपैकी एक मुर्ती भवानी मातेची असावी का?)
(हे माझे वैयक्तिक मत आहे.)
राणूबाईचे कानले - (संदर्भ:- रायगडची जीवनकथा, )
रायगडवर
पुर्वी एक दगडाचे कानले होते, त्याला राणुबाई म्हणत. पोतनीसांकडुन
पेशव्यांकडे रायगड घेण्यासाठी आपाजी हरि यांच्या नेतृत्वाखाली जी लढाई झाली
त्या युद्धात आपाजीच्या गारद्याने हे कानले जमिनीतुन वर काढले. पुढे याची
पुजा अर्चा होत होती. (कानले म्हणजे मुर्ती. आदिवासी समाज पृथ्वीला कानले
म्हणतो.)
अप्रतिम
ReplyDeleteApratim.....
ReplyDeleteMilind Kshirasagar
Apratim.....
ReplyDeleteMilind Kshirasagar
बहिर्जी नाईक यांचा समावेश सध्या कोणत्याही ठिकाणी नाही त्यांची सुध्दा मोलाची कामगिरी आहे तरी कृपया त्यांचा एखादा पुतळा उभारावा
ReplyDeleteपुतळा उभारण्याच काम बे सरकारचे आहे. रायगडावर कोणतही काम करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते.
Deleteमी फक्त ब्लॉग लिहत आहे. बाकी मी वैयक्तिक रायगडावर काहीही करू शकत नाही.
आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा.
खूप छान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteपण जगदीश्वर मंदिरात शिवाजी राजे व कवी भूषण यांची पहिली भेट झाली होती, तुम्ही चुकून कवी कलश लिहिलंय.
ReplyDelete