महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र, अर्थात बेतुल दुर्ग.
छत्रपतींनी गोव्यात बांधलेला किल्ला.
सर्व प्रथम गोव्या सारख्या महाराष्ट्रा शेजारी असलेला पण किल्यांवर फारसा अभ्यास न झालेल्या ठिकाणी अभ्यास करून किल्यांची माहिती लिहलेल्या श्री सचिन मदगे सर यांचे खूप खूप आभार, नाहीतर आमच्यासारख्या परराज्यात किल्ले फिरायला जाणाऱ्या लोकांचे माहितीअभावी वांदे झाले असते.
महाराजांनी आदिलशाहीचा गोव्यातील मुलुख ताब्यात घेतल्यावर १६७९ (1679) च्या मे महिन्यात बाळ्ळीच्या हवालदाराला साऊथ गोव्यातील केपे तालुक्यातील बेतुल गावात जिथे समुद्र आणि नदी मिळते तिथे साळ नदीच्या किनाऱ्यावर दुर्ग (किल्ला) बांधायला सांगितला.
हा किल्ला सध्या ज्या ठिकाणी आहे ती जागा खाडी सारखी असून अलीकडील म्हणजे जिथे किल्ला आहे तो प्रदेश मराठ्यांकडे व समोरील म्हणजे नदीच्या पलीकडील प्रदेश हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता.
फोटो बघून लक्षात येईल कि किल्ला किती महत्वाच्या ठिकाणी बांधला आहे.
मराठे व पोर्तुगीज यांच्यात मैत्रीपूर्ण करार झाला होता, बेतुल किल्ला पोर्तुगीज प्रदेशातून अगदी समोर असला आणि बंदुकीच्या गोळीच्या टप्यात असला, तरीही पोर्तुगीजांचा हा किल्ला बांधायला विरोध होता. त्याला कारणही तसेच होते. नदी मार्गे समुद्रातून होणाऱ्या सागरी वाहतुकीवर निर्बंध येतील, त्यांच्या राज्याच्या सुरक्षिततेल धोका होईल आणि म्हणूनच पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधायला विरोध केला. याच अनुषंगाने पोर्तुगीजांनी या किल्ल्याचे बांधकाम थांबवण्यासाठी हालचाल करण्याचे ठरवले. १५ मे १६७९ रोजी पोर्तुगीज गव्हर्नर आणि कॅप्टन जनरल आंटॅनियु पाइश-द-सांद यांनी राज्य सल्लागार मंडळाची सभा घेतली आणि ठरवले की राशोल (राईस) चा कॅप्टन फ्रान्सिस्कु-द-लैंताव याला पत्र पाठवून सर्व बातमी दिली आणि सांगितले की तुम्ही मराठ्यांना पत्र पाठवून सल्ला करावा, आणि किल्ल्यांचे बांधकाम बंद करावे, तसेच किल्ल्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी. गव्हर्नर च्या आज्ञेनुसार कॅप्टन ने बाळ्ळीच्या हवालदाराला पत्र पाठवले, त्यावर या हवालदाराने जे उत्तर दिले तर स्वराज्याचा अभिमान दाखवणारे होते. हवालदार उलट दिलेल्या पत्रात लिहतो की - " आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने किल्ला बांधत आहोत, किल्ल्याचा उपसर्ग (त्रास) तुम्हाला होणार नाही, आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट ही की आमच्या राज्यात आम्ही काहीही करण्यास मुखत्यार (मोकळे) आहोत, आम्हाला त्याचा जाब विचारणारे तुम्ही कोण? "
दुर्गाचे (किल्याचे ) सध्याचे अवशेष
हवालदारचे हे उत्तर ऐकून गव्हर्नर कॅप्टन व फोंडयाच्या सुभेदाराला (पोर्तुगीज) पत्र लिहून बेतुल किल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगतो. ( ज्याचे पुढे काय झालं माहीत नाही, ज्या अर्थी हा किल्ला बांधून झाला त्याअर्थी कदाचित त्यानेही काही केलं नसावं) पण पुढे गव्हर्नर कॅप्टनला असही सांगतो की जर सुभेदारच उत्तर आलं नाही तर तुम्ही सैन्य घेऊन जा आणि किल्ल्याचे बांधकाम पाडा, पण अस करताना हे काम सरकारच्या ( पोर्तुगीज सरकारच्या ( म्हणजे गव्हर्नरच्या) सहमतीने झालं आहे याचा सुगावा शिवाजीच्या (इथे महाराजांचा उल्लेख जसा पत्रात आलाय तसाच केलाय) लोकांना लागू देऊ नका. (हे वाचताना लक्षात येईल की फक्त महाराष्ट्रच नाही तर गोव्यातही महाराजांची दहशत होती, पोर्तुगीजांनीही मराठ्यांशी मैत्रीपूर्ण करार केला होता, आणि त्यांना धास्ती होती की हा हल्ला जर पोर्तुगीजांनी केला अस शिवाजीला कळलं तर शिवाजी आपल्यावर उलट हल्ला करेल,( आजवर शिवाजीचा एकही वार खाली गेला नाही, हे पोर्तुगीजांना चांगलेच माहीत होत...) पुढे पोर्तुगीजांनी हा किल्ला गुपचुप पडायचा अस ठरवलं, मात्र त्यांच्यात ते धाडस झालं नाही.
या किल्ल्याचा उल्लेख पुढे १६८२-८३ ( छत्रपती संभाजी महाराजांचा काळ) काळात येतो ज्यात त्यांनी संभाजी राजेंविषयी आणि या किल्ल्याचा या पत्रात उल्लेख केला होता.
सध्या या किल्ल्याच्या ठिकाणी फक्त 1 बुरुज व तोफ आहे, बाकी परिसरात खूप झाडी आहे, सदर परिसर स्वच्छ केला तर आणखी काही सापडू शकते.
सागर अभंग या मित्राला किल्ला दाखवताना.
सोबत या किल्ल्याचा लोकेशन मॅप देत आहे.
https://goo.gl/maps/wSqdQb54iNTVztEs9
फोटो साभार-
आबासाहेब कापसे( गडवाट समूह)
सुप्रभा बहिरम
सागर अभंग.
संदर्भ -
पोर्तुगीज दफ्तरातील " अशांतूश दो कॉन्सीलो दो इस्तांद" खंड -04
शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रे -
पत्राचा मराठी अनुवाद - गोव्याचे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक "श्री सं.श. देसाई सर)
आणि सचिन मदगे सर यांचे लेख ज्यांनी गोव्यातील किल्ले समजून घेण्यास ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टीने मदत केली.
पोर्तुगीज दफ्तरातील " अशांतूश दो कॉन्सीलो दो इस्तांद" खंड -04
शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रे -
पत्राचा मराठी अनुवाद - गोव्याचे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक "श्री सं.श. देसाई सर)
आणि सचिन मदगे सर यांचे लेख ज्यांनी गोव्यातील किल्ले समजून घेण्यास ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टीने मदत केली.
Harsh,
ReplyDeleteThat's a great work
Keep it up
Thank you sir😀
Deleteकिल्ल्याचा इतिहास आणि माहिती संकलन उत्तम. साधी सोपी आणि सहज कळण्याजोगी शब्दरचना. फक्त किल्ल्याचे अजून फोटो असते तर बरं झालं असतं.
ReplyDeleteकिल्याचे जास्त अवशेष आता नाहीत. सदर जागी फक्त 1 बुरुज आणि तोफ आहे- जिचा फोटो ब्लॉग मध्ये आहे. बाकी जागेची साफसफाई केल्यास काही अवशेष मिळू शकतील असा अंदाज आहे.
Deleteधन्यवाद 😊
Keep it up harsh
ReplyDelete