Saturday, 19 August 2017

रायगड आणि मी #1


रायगड आणि मी...
स्तंभ. 

नगारखाना 

रायगड.. स्वराज्याची दुसरी राजधानी. 

The capital of Maratha Empire...

"पुर्वेकडचा जिब्राल्टर" म्हणुन  ज्याची नोंद सातासमुद्रापल्याडील इंग्रजांनी केली तोच हा रायगड. अभेद्य, अविचल, रांगडा आणि कणखर.

रायगड बद्दल आजवर बर्‍याच जणांनी बरंच काही लिहलं आहे, सांगीतल आहे, अनुभवलही आहे. पण या लेखातुन मला, मी पाहीलेला रायगड सांगायचा आहे.. म्हणुन हा अट्टाहास.
तसा मी रायगडावर बर्‍याचदा गेलो आहे.. सन 2011 पासुन महीन्यातुन किमान एकदा तरी  जातो, ते ही मुक्कामी.
2012 साली ऐन दिवाळीत रायगडावर होतो..  ज्या गडकिल्यांच्या सोबतीने स्वराज्याचे शिवधनुष्य समर्थपणे पेललं गेलं तेच गडकोट ऐन दिवाळीत अंधारात असतात, अगदी राजधानी रायगडही. याच गोष्टीची खंत मनात बाळगून त्याच वर्षीपासुन 'एक पहाट रायगडावर' हा उपक्रमही सुरू केला. आणि पणत्या, मशालींच्या झगमगाटात रायगड पाहण्याच सौभाग्य दरवर्षी मिळत गेलं.
मी आजवर असे बरेच व्यक्ती बघीतलेत जे म्हणतात की मी रायगड बघीतला. माझा प्रश्न तोच असतो.. तुम्ही बघीतला कि पाहीला? प्रथमदर्शनी जरी हे दोन्ही शब्द समानार्थी वाटत असले तरी त्यातला गहनपणा जास्त आहे. तुम्ही रायगड फक्त बघीतलाय, तो अनुभवला नाही. जर त्यातल्या बारीक सारीक गोष्टी अनुभवल्याच नाहीत तर तुम्हाला रायगड दिसणार तरी कसा? समजणार तरी कसा?
रायगडावर जाऊन नक्की काय बघाव? कसं बघावं.. आणि का बघाव हे मी थोडफार समजावुन सांगु शकतो.  ज्ञात-अज्ञात सर्व अभ्यासकांची पुस्तके आणि प्रत्यक्ष चर्चा 
करुन मीही थोडाफार रायगड अनुभवलाय.
या सार्‍याची थोडक्यात आणि सोप्या भाषेत मांडणी मी नक्कीच करेन. बर्‍याच गोष्टी मला समजल्यात, त्या याआधी अन्य कोणाला कळल्या असतील, नसतील. मात्र मी सह्याद्रीच देणं लागतो म्हणुन हा प्रयास.
रायगडच्या वास्तुुचं अभ्यासपुर्ण आणि शास्त्रीय दृष्ट्या 
महत्व काही भागात मी हळुहळू मांडेनच.
एक-एक वास्तुची मी माहीती देत राहीन, तुम्ही वाचत रहा.असो.  लेखन सीमा..
कळावे- हर्ष पवळे. (सह्याद्री मित्र)


13 comments:

  1. मस्तच भाऊ...वाचायला आवडेल..अनुभवायला ही🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. असेच आशीर्वाद ठेवा.

      Delete
  2. उत्सुकता आहे

    ReplyDelete
  3. Congratulations harsh.

    It's great initiative

    ReplyDelete
  4. नक्कीच तुझ्या लिखाणातूनही रायगडची अनुभूती होईल त्यामुळे या ब्लॉग साठी खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. अश्याच शुभेच्छा पाठीशी राहुद्यात.

      Delete
  5. अप्रतिम मित्रा

    ReplyDelete
  6. मस्त लिहिले आहे हर्ष असेच लिहीत राहा :)

    ReplyDelete
  7. अप्रतिम मित्रा....

    ReplyDelete